भुवनेश्वर कुमारचा विक्रम   

आयपीएलमध्ये सर्वाधिक बळी घेणारा दुसरा गोलंदाज

नवी दिल्ली :  यंदाच्या आयपीएल हंगामातील ४६वा सामना रविवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्स संघात खेळला गेला. आरसीबीने मागील पराभवाचा बदला घेत शानदार विजय मिळवला. यावेळी आरसीबीचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारनेही विजयात मोठी भूमिका बजावली. त्याने अतिशय दमदार गोलंदाजी केली. यासोबतच भुवनेश्वर कुमारने आपल्या नावावर एक मोठा रेकॉर्ड केला आहे. तो आता आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा दुसरा गोलंदाज बनला आहे.
 
दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात भुवनेश्वर कुमारने ४ षटकांच्या स्पेलमध्ये ३३ धावा देत ३ विकेट्स घेतल्या. त्याने विशेषतः शेवटच्या षटकात खूप प्रभावी गोलंदाजी केली. त्याच वेळी, भुवनेश्वरने आपल्या नावावर एक मोठा रेकॉर्ड केला. आता तो आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा दुसरा गोलंदाज बनला आहे.
 
भुवनेश्वर कुमारने आतापर्यंत एकूण १८५ सामने खेळले आहेत. या काळात त्याने १९३ विकेट्स घेतल्या आहेत. त्याची सर्वोत्तम गोलंदाजी कामगिरी १९ धावांत ५ विकेट्स अशी आहे. आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेण्याचा रेकॉर्ड युजवेंद्र चहलच्या नावावर आहे. चहलने आतापर्यंत १६९ सामन्यांमध्ये २१४ विकेट्स घेतल्या आहेत. आता भुवनेश्वर कुमार दुसर्‍या क्रमांकावर आला आहे.
 
भुवनेश्वर कुमार हा आयपीएलमधील दिग्गज गोलंदाजांपैकी एक आहे. जो दोन्ही बाजूंनी चेंडू स्विंग करण्यात पटाईत आहे. या क्षमतेमुळे तो २०११ पासून या मेगा लीगचा भाग आहे. त्याने सनरायझर्स हैदराबादसाठी आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने खेळले आहेत. या हंगामात तो आरसीबीचा भाग बनला आहे आणि तो उत्कृष्ट कामगिरी करत आहे.
 
आयपीएल २०२५चा ४६वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळला गेला. या सामन्यात आरसीबीने दिल्लीचा त्यांच्याच घरच्या मैदानावर ६ विकेट्सने पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्स संघाला निर्धारित २० षटकांत ८ विकेट्स गमावून फक्त १६२ धावा करता आल्या. प्रत्युत्तरात आरसीबीने १८.३. षटकांत केवळ ४ विकेट्स गमावून हे लक्ष्य गाठले.
 

आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स

युझवेंद्र चहल - २१४
भुवनेश्वर कुमार - १९३*
पियुष चावला - १९२
सुनील नारायण - १८७
रवी अश्विन - १८५
ड्वेन ब्राव्हो - १८३
 

Related Articles